मुख्य सामग्रीवर वगळा

मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांची धडाकेबाज कामगिरी


ठाणे प्रतिनिधी (मुंब्रा):प्रेयसी पासुन विभक्त करण्यासाठी कट रचुन पिस्टल चा धाक दाखवून  जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना मुंब्रा पोलिसांनी केले 48 तासात जेरबंद.

Mumbra police

बेडेकर नगर , दिवा पुर्व येथील एक इसमावर दिनांक 15/09/ 2021 रोजी रात्रौ १०.३० वा.चे.सुमारास ते राहत्या घरातुन कामावर जाण्यासाठी अॅटोरिक्षातुन जात असताना आगासन रोड वरील मानव कल्याण हॉस्पीटल समोर दोन अज्ञात व्यक्तीनी विना नंबरच्या मो.सा.वरून येवुन अॅटोरिक्षा अडवुन सदर इसमावर पिस्टल रोखुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी प्रसंगावधान राखुन फिर्यादी शेजारी असलेल्या मानव कल्याण हॉस्पीटल येथे आश्रय घेतला . त्यानंतर आरोपीस फिर्यादी मिळुन न आल्याने ते पळुन गेले . अशा तक्रारीवरून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुरजि क्र . | 893|2021 भा.द.वि.कलम 506( 2 ) , 504, 341, 120 ( ब ) सह आर्म अॅक्ट 3,25अन्वये दिनांक 16/09/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .

घटनास्थळावर मिळालेल्या सी.सी.टी.व्ही . फुटेजच्या आधारे गोपनीय माहीती व तात्रीक तपास करून प्रत्यक्षा पिस्टलचा धाक दाखवुन गुन्हा करणारे दोन्ही आरोपी १ ) साजन जयदास पाटील वय २१ वर्षे रा . स्वत : चे घर , गाव नारायणगाव , ता.अंबरनाथ जि.ठाणे २ ) सनी सुरेश राजभर वय २१ वर्षे रा . रूम नं . ६०३.सहावा माळा , अर्जुन हाईटस , साई हॉस्पीटलचे समोर , वैभव नगरी , डोंबिवली पु.जि.ठाणे तसेच कटाचे मुख्य सुत्रधार ३ ) रूपेश अभिमन्यु पाटील वय ३१ वर्षे , धंदा- हॉटेल , रा.ठि. रूम नं २०२ , शिवधाम अपार्टमेंट , पडले गांव , जि . ठाणे ४ ) अंकीत मोरेश्वर शिंदे वय २५ वर्षे , धंदा- सलुन , रा.ठि. वामन बाबा वाडी , तळोजा मजकुर , वामन बाबा मठ , ता पनवेल , जि . ठाणे यांना मुंब्रा पोलीस ठाण्याचे तपास पथकाने ४८ तासाच्या आत ताब्यात घेवुन दिनांक 18/09/2021. रोजी अटक केलेली आहे .

सदर आरोपी कडे केलेल्या तपासात अटक आरोपी पैकी रूपेश अभिमन्यु पाटील याचे फिर्यादी याच्या पत्नी सोबत प्रेम संबंध असुन , सदर प्रेयसी पासुन तिच्या पती तथा फिर्यादी यांना अलग करून तिला सोडून अन्यत्र निघून जाण्यासाठी त्यांनी वरील अटक आरोपीत सोबत कट रचुन सदरचा गुन्हा केलेला असले बाबत निष्पण झालेले आहे .

याशिवाय अटक आरोपी रूपेश अभिमन्यु पाटील याने सनी सुरेश राजभर तसेच इतर अन्य आरोपी वर बरोबर कट रचून यापुर्वी दिनांक २७/१२/२०२१ रोजी दिवा इंपीग जवळ , खर्डी रोड वर दाखल गुन्हयात फिर्यादींची मोटार सायकल आडवून प्राणघातक हल्ला करून फिर्यादी यांच्याकडील रोख रक्कम चोरी केलेली असल्याचे देखील निष्पन्न होत आहे सदरबाबत मुंब्रा पोलीस ठाणे गु.र.क१०१ ९ / २०२० भादवि कलम३९ ४,३४१,३४ नोंद असून सदरचा तपास चालू आले .

तपासादरम्यान अटक आरोपी सनी सुरेश राजभर याच्या कडुन गुन्हयात वापरलेली पिस्टल व दोन जिवंत काडतुस व मोटार सायकल असा मुददेमाल जप्त करण्यात आले . याशिवाय सर्व आरोपीचे गुन्हयासाठी वापरण्यात आलेले मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे .

सदरची कामगिरी हि मा . श्री जगजीत सिंग , पोलीस आयुक्त , ठाणे शहर , श्री सुरेश कुमार मेकला , सह पोलीस आयुक्त ठाणे शहर , मा . श्री . अनिल कुंभारे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , ठाणे शहर , मा . श्री अविनाश अंबुरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ , ठाणेशहर , मा . श्री व्यंकट आंधळे , सहायक पोलीस आयुक्त , कळवा विभाग , ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा . श्री मधुकर कड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , मुंब्रा पोलीस ठाणे , सहायक पोलीस निरीक्षक श्री एस.एस.शेळके , सहायक पोलीस निरीक्षक श्री संतोष उगलमुगले , पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे , पो.हवा / ६८४ मोरे , पोह ६२४० / रहिश जाधव , पोना / ६१९ ६ मोरे , पोना / ७०५८ पाटील , पोना / ३१४४ घोडके , पोना / तामोरे , पोना / २८० ९ सोळंके , पोना / ७२९९ वैरागकर , पोना ७११७ / विजय सपकाळे , पोशि / ४२८० शिंदे पोकॉ / माळी या पथकाने केली आहे . सदर दोन्ही गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके व पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे करीत आहे .

मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके यांनी व त्यांच्या टीमने असे असंख्य गुन्हे उघडकीस आणले आहेत त्याचबरोबर माणुसकीचे दर्शन घडवले आहे.त्यांच्या या कार्यासाठी भटका विमुक्त समाज संघर्ष समिती अध्यक्ष श्री विकास जगताप व सर्व समितीचे सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके व यांच्या संपूर्ण टीमला राष्ट्रपती पुरस्कार मिळावे याच्यासाठी शिफारस करणार आहे.

                                  सहसंपादक-श्री मोहन शिंदे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोरगरीब रुग्णांसाठी भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष’चा पुढाकार

पुणे – प्रतिनिधी : कालिदास उबाळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. निनाद संगिता मल्हारी टेमगिरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे. भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत “भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष” अंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय योजना, पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध खाजगी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते. यामध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत कॉकलियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, अस्थिमज्जा व हात प्रत्यारोपण, हिप व गुडघा बदल, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसीस, कर्करोगासाठी किमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग, नवजात शिशूंचे आजार, बर्न व विद्युत अपघात अशा व...

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन – विष्णुदादा भोसले पुरंदर : पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक वर्ग २ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे १२ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून पीडित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करण्यात आले आहे. ही कारवाई पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून अधिकाराचा गैरवापर करत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून संबंधित अर्जदारास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात...

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय जाधव

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. पुणे : समाजातील गोरगरीब, भटक्या विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भैरव क्रांती सेना संचलित भैरव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांतील भटक्या विमुक्त वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा ठाम निर्धार या संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. भैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, नैतिक मूल्यांची जोपासना तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळावे आणि समाज सक्षम व्हावा, हा या संस्थेच्या कार्यामागील मू...